कुस
कुस
1 min
7
खूप आराम होता आई कुशीमध्ये
दिस-रात असायचो खुशीमध्ये
पुन्हा एकदा कुशीत झोपावं
परत वाटत लहान व्हाव
ऐश आराम करतो पण आनंदी नाही
पदरा आड लपण्याच वय नाही
प्रेमाने हात फिरवते तु डोक्यावरून
वाटते सगळे तीर्थ आलो फिरुन
पोसल कसं तू सोसल किती
आई नाय कळत तुझी महती
हे मस्तक तुझ्या चरणावरती
किती जन्म घेता नाय
होत उपकाराची भरती
ठेच लागता मला
वेदना होतात तुला
जीवापेक्षा जास्त साभांळल
तू या काळजाच्या तुकड्याला
