रात्र काजव्यांची
रात्र काजव्यांची
गर्द तिमिराच्या मैफिलीत सख्या
वर्षाव चांदण्यांचा झाला
साथ लाभली तुझी मला
चंद्रही गगनारुढ झाला
वाहे हा थंड गारवा
मोगऱ्याचा सुगंध दरवळला
चमचम चमकत्या काजव्यांचा
धरतीवर नभांगणच जणू अवतरला
तरुंवरती वाटे जणू
मोत्यांचा साजच चढला
बेधुंद काजव्यांच्या रात्रीचा
सोहळाच किती रंगला

