रात्र एक विरहाची
रात्र एक विरहाची


वळणावरती ओझरत्या, का सोडलीस साथ माझी
सांग माझ्या प्रेमाची ग, काय आगळीक होती
विसरूनी मी स्वतःला, तुझ्यावर प्रेम केले
ही बाब माझ्या हृदयाची, जरा भावनिक होती
भुलवून जगास हिंडलो, सायंकाळच्या प्रहरांती
ती भेट आपली नियतीने ठरवली क्षणिक होती
बहार माझ्या फुलबागेचा, तुझ्या श्वास वलयांनी होता फुलला
तुझ्या जाण्याने ती बाग फुलांची, अजूनही भ्रमित होती
सांगता माझ्या प्रीतीची, कधीच होणार नाही
ही कालची शोकांतिका, आजही तीच होती
येशील तू स्वप्नांत माझ्या, या आशेने आता निजतो
आजवर ना तू स्वप्नी म्हणुन, माझी निद्रा व्यथित होती
दर्पणी मनीच्या जेव्हा, पहिले मी स्वतःला
रात्रीत विरहाच्या, तुझी आसवे मिठीत होती