STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Inspirational

3  

DATTA VISHNU KHULE

Inspirational

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

1 min
250

तुकडोजी महाराजांची ग्रामविकास विचारसरणी

आयुष्यभर देह झिजविला तयांनी समाजहिता कारणी

राष्ट्रसंतांचे विचार होते बहु क्रांतिकारी

अठरा पगड जातींना शिकवण त्यांची समविचारी 


जणू राष्ट्रभक्तीचा ज्ञानमय सागर

महाराजांनी केला भाजनातुनी ग्रामोउन्नतीचा जागर 

सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक केला पुरस्कार

भजनातुनी केला राष्ट्रीय ऐक्याचा प्रसार 


आई मंजुळाबाई बहु भाग्यवान

वडील बंडोजी होते पुण्यवान

पोटी पुत्र जन्मला वैरागी अन हिऱ्या समान

नाव दिधले तयांचे राष्ट्रपुरुष ' माणिक '


महान राष्ट्रसंत महाराज तुकडोजी

गुरु त्यांचे महाराज आडकोजी

आपल्या लेखणीतुनी नष्ट भेदभावाची दरी

राष्ट्रपतिभवनात गाजली त्यांची खंजिरी


ऐकुनी राष्ट्र एकतेचे भजनी बोल

राष्ट्रपतींनी 'राष्ट्रसंत ' हि पदवी केली बहाल

लेखणीतुनी रचिली भव्य अमृततुल्य ग्रामगीता

दर्शन घडते त्यातुनी ग्रांमविकास , समता अन बंधुता 


राष्ट्र धर्माची पताका घेऊनि

राष्ट्र रक्षणा प्रगल्भ विचार देऊनी

समतेची मशाल सदैव तेवत ठेवुनी

अमर जाहले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रहिताचा पवित्र गाथा देऊनी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational