Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Murari Deshpande

Inspirational

2  

Murari Deshpande

Inspirational

राष्ट्रगुरु संत समर्थ रामदास

राष्ट्रगुरु संत समर्थ रामदास

1 min
693


राष्ट्रगुरु संत समर्थ रामदास स्वामी||

संसार,अध्यात्म,राजनीती । करोनी निरीक्षण सूक्ष्म अती ।

अमृत दिले लोकाहाती । दासबोध ।। १ ।।


वर्ज्य विषय नाही कोणता । राष्ट्रसंत समर्थ नेणता ।

आचरणी उपदेश आणता । सुख वर्षा ।।२ ।।


अभ्यासली अवघी सृष्टी । विज्ञानाची दिव्य दृष्टी ।

पानोपानी सद्गुण पुष्टी । दासबोध ।। ३।।


राष्ट्राभिमानी समर्थ विचार। जीवनी केला तैसाची आचार ।

स्वधर्माचा स्पष्ट प्रचार । भारत भ्रमणी ।।४।।


राष्ट्रास देई ताठ कणा । समर्थ विचार तोची म्हणा ।

देशद्रोहयामाथी हाणा । भीमटोला ।। ५।।


ज्वलंत विचारांची खाण जणू । देवूनी मेंदूस थोडा ताणू ।

निश्चये अमलात आणू । राष्ट्रासाठी ।। ६।।


राष्ट्रसंत जे लिहोनि गेले । त्याकडे दुर्लक्ष केले ।

करंटे होवोनी मेले । ऐसे न व्हावे ।।७।।


उपदेशिले वर्तन यथार्थ । जाणोनी त्यातील मतितार्थ ।

झीजोनी होऊ कृतार्थ । राष्ट्रासाठी ।।८।।


दासबोध व्हावा श्वास । दासबोध व्हावा ध्यास ।

उभवू राष्ट्र उंच खास । दासबोध पाया ।।९।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational