STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

3  

UMA PATIL

Inspirational

रानगंध

रानगंध

1 min
11.9K


घनदाट रानात

आला रानफुलांचा सुगंध

भुलवितो रानगंध

मनमोहक.....


दुतर्फा झाडी

मधोमध चिंचोळी वाट

वळणाचा घाट

जंगलात.....


रानात पसरला

सूर्याचा सोनेरी प्रकाश

निळे आकाश

माथ्यावरी.....


हिरवीगार पाने

वेगवेगळी रानफुले फुलती

वाऱ्यावरी डुलती

रंगोबेरंगी.....


वाऱ्यावर चौफेर

रानाचा पसरला सुवास

रानफुलांचा वास

गोडसर.....


रानगंधाच्या चाहुलीने

जमले सारे प्राणी

गातात गाणी

जंगलाची.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational