STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

रान-कविता कवी-संजय र. सोनवणे

रान-कविता कवी-संजय र. सोनवणे

1 min
242

चला रानात फिरायला 

हिरव्या भाज्या पाहयला 

काळ्या आईच्या रानात 

हिरव्या भाज्या आणायला 


असे निसर्गाचे देणे 

काळ्या मातीत बहरले 

 जीव त्यांचे अंकुरले 

वरदान पाऊस ठरले 


हिरव्या भाज्याना शेतात 

न्हाऊ घातल्या पाऊसानं 

पावसाळी पाणी जणू 

त्यांचे अमृता समान 


मानवाला लाभते वरदान 

मळे फुलतात हिरवेगार 

भाज्या उभ्या दिमाखात 

सांगे खा रे भरपूर 


न्यारी चव भाजीची 

वाटते खूप अवीट 

तिच्या विविध बहिणी 

राही करून एकजूट 


कधी दगडात फुलतात 

कधी मातीत फुलतात 

मातीच्या अतूट मैत्रीने 

आयुष्य मजेत जगतात 


कधी रानमाळावर दिसे 

कधी हिरव्या डोंगरावर दिसे 

जिथे सुंदर जीवन 

तिथे त्यांचे आयुष्य वसे 


दरवर्षी भेट माणसांची 

नाती जपली मानवाची 

माणसाच्या आयुष्यात 

तेजस्वी रुपात दिसायची 


हिरवी ताजी भाजी 

शाकाहारी असे आहार 

माणसाचे आरोग्य जपते 

खायला खूप चवदार


हिरवे मन जपते 

हिरवे हृदय जपते 

किती मोहक मन !

सदा जगासाठी खपते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational