STORYMIRROR

Ashwini - Mishrikotkar

Inspirational

3  

Ashwini - Mishrikotkar

Inspirational

रामाचा महिमा

रामाचा महिमा

1 min
230

चैत्र शुद्ध नवमीस

जन्म बाळाचा झाला

विष्णूच्या सातव्या अवतारात

जन्म तू घेतला


रयतेचा लाडका राजकुमार

वचनात बध्द झाला

आईच्या शब्दासाठी

चौदा वर्षे वनवास भोगला


पुरुषोत्तम मर्यादा श्री राम

गाऊ तुझे गुणगान 

फुले अर्पिते तुझ्याच चरणी 

तू या भारतभूमीची शान, 


पुत्र शोभे दशरथ राजाचा

कौशल्याच्या हृदयाचा श्वास तू

सीता आणि लक्ष्मणाचे तर

प्रतिबिंब जणू आरशातले तू 


भरतासारखा भावाने सिंहासनावर

पादुकांची स्थापना केली

आयुष्यभर एकनिष्ठ राहून

पवित्रतेची जोपासना केली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational