STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

राम राज्य येऊ दे

राम राज्य येऊ दे

1 min
160

राम राज्य येऊ दे देवा 

संकटांनी झालो बेजार

पिडिले दीनहीन पामर

नडलाय चीनचा शेजार


बंदच झालीत देवालये 

उद्ध्वस्त होतो बाजार

काळजी न घेणाऱ्याला

आला विषाणुचा आजार 


माणुसकीचे सरले नाते

कठीण झालेय जगणे

समज नि गैरसमजातून

कळेना झाले हे वागणे


पसरला अंधकार जगी

नात्यांची ना उरली हमी

सुरक्षित जीवन जगण्या

येईना माणुसकी कामी


वाटतेय मिळावे फिरुनी 

पहिले हूंदडण्याचे दिवस

स्वच्छंदी स्वैर ते फिरणे

करतोय देवालाही नवस

 

किती झिजले मातापिता 

झाले पुत्र पैशाचे शिकारी 

वृद्धाश्रमाची वाट धरावी

जणू रस्त्यावरचे भिकारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational