राखी
राखी
राखीचा हा बंध प्रेमाचा ,
प्रेम आहे भावा बहिणीचा ।
रेशमाच्या धाग्यांनी बांधून त्याला ,
नात्यांचा हळूवार स्पंदनाचा ॥
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ,
भावास असेल बहिणीचा साथ ।
कशीही परिस्थीती आली तरी ,
असेल दोघांचा हातात हात ॥
दुर असून ही या दिवशी ,
लहानपणीचे दिवस आठवतात ।
हातातल्या राखी ला बघून ,
ताईचे प्रेम मनी साठवतात ॥
प्रेमाचं प्रतिक आहे राखी ,
त्यात भावा बहिणीचे प्रेम असे ।
बहिणीच्या रक्षणार्थ सदा ,
भावाचे जीवन सज्ज दिसे ||
भावाच्या सुखाच्या व दिर्घायुष्याची ,
कामना नेहमी बहिण करते ।
रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला ,
बहीण अगणित शुभेच्छा देते ॥