STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

राज्याभिषेक...!

राज्याभिषेक...!

1 min
382

असा रांगडा गडी

त्याला कोणती अडी

अंतर्बाह्य निर्मळ कुडी

स्वराज्याचा ध्यास घडी घडी


जिजाऊच्या कुशीचा हिरा

सदा ध्येयाची त्वरा

भूमीभक्त हा खरा

शोभे मराठी तुरा


राजबिंडे रुपडे

त्याचे तेज सर्व दूर पडे

चालता अंतरी वाजती चौघडे

तेंव्हा पाऊल पुढे पडे


स्वप्नपुर्ती होता

निमिषात राज्य स्थापले

लागला विश्वासी पता

सिंहासनाधिश्वर श्रीमंत

   शिवाजी राजे छत्रपती होता..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational