राज्याभिषेक शिवछत्रपतींचा
राज्याभिषेक शिवछत्रपतींचा
६ जुन १६७४ ला सोहळा रंगला
छत्रपती स्वराज्याला लाभला
पहाटेच दर्शनाने कुलदैवतेच्या
मंगमलमयी दिवस सुरु झाला
राजांनी शुभ वस्त्र केले परीधान
ब्राम्हणांना केले वस्त्राभुषणं दान
गळ्यात शोभती फुलमाळा छान
सिंहासनावर राजे होते स्थानापन्न
सोयराबाई शेजारीच गाठ बांधून
अष्टप्रधानही ऊभे गंगाजल घेऊन
मंत्रघोषात सुरु होते वाद्यांचे वादनं
पुजलं सवाष्णींनी आरती ओवाळून
घातले मग लाल रंगाचे वस्त्र छान
फुलहार व अलंकार दिसले शोभुन
राजमुकुटाने वाढला राजांचा मान
सोन्याने मढवीलेले होतेच सिंहासन
शिवरायांचा जयजयकार चहुबाजने
आसमंत दुमदुमला राजांच्या नावाने
सांगते कथा शिवकन्या अभिमानाने
वंदन करते महाराजांना भक्तीभावाने
