STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Abstract Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Abstract Tragedy

राजसा

राजसा

1 min
213

दारूत आता डुंबलेला राजसा आहेस तू

प्रेमात थोडा भंगलेला राजसा आहेस तू 


प्रेमातल्या व्याख्या चुकीच्या लावतो नाहीस का

सूडात मोठ्या पेटलेला राजसा आहेस तू 


जाणून घे सामर्थ्य हृदयाचे तुझ्या थोडे तरी 

सौंदर्य ऊर्जा लाभलेला राजसा आहेस तू 


आयुष्य डावावर नको लावूस निष्कारण तुझे

हारूनही बघ जिंकलेला राजसा आहेस तू 


दारूमुळे कोणी कधी नाही सुखी झाला इथे

सुंदर फुलांनी गंधलेला राजसा आहेस तू 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract