Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

राजस सुकुमार

राजस सुकुमार

1 min
238


सुस्वरुप राजसचि सुकुमार 

अर्जुन महान योद्धा सर्वोत्तम 

एकाग्रता गुण अंगी अलौकिक 

शरसंधान गुरु द्रोण महोत्तम(१)


गुरुंकडूनी शिके मन लावूनी

फक्त लक्ष्यच बघतसे नयनी

चक्षुवेधाची आज्ञा गुरुदेवांची

बघे नयनी लक्ष्य एकाग्रतेनी (२)


अज्ञातवासामधी सावधतेने

रुप घेई बृहन्नडा नर्तिकेचे

हरहुन्नरी चतुर अर्जुनाने

काम साधले कौतुक लीलेचे (३)


धर्नुविद्येत असे नित्य अग्रणी

कर्णच एक तोलाचा मानी

चक्र अडकता त्याचे जमिनी

विनवे तयास थांबवण्या झणी (४)


हुशार अर्जुन पट जुना काढी

विचारी प्रश्न परखड कर्णासी

द्रौपदी वस्त्रहरणावेळी कर्णा

सांग कुठे गेला धर्म त्यावेळी?(५)


युद्धनीती चतुर योद्धा अर्जुन

तत्काळचि करी कर्णाचे मर्दन

युद्ध जिंकले कृष्णामृत ऐकून

पराक्रमे दुमदुमे त्रिभुवन (५)


अमर जाहला योद्धा जगती

जिंके पराक्रमे द्रुपदकन्येसी

पराक्रम अर्जुनाचा त्रिभुवनी

कुंतीपुत्र ख्यातनाम हो जगती (६)



Rate this content
Log in