STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Inspirational

3  

Chaitali Warghat

Abstract Inspirational

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

1 min
196

राजर्षी शाहू हें खरे लोकशाहीवादी

समाज सुधारक सक्षम राज्यकर्ते होते

आधुनिक महाराष्ट्रातील आदर्श राजा

सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते


शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात

महत्वाच्या सुधारणा घडवून आणल्या

बहुजनांना शिक्षणाचा अधिकार देऊन

सामाजिक समस्या ही सोडविल्या


समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षण

पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला 

शाहू महाराजांनी सक्तीच्या मोफत

प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला


सामान्य जनतेला न्याय, उन्नतीसाठी

परिवर्तनाला गती देणारे सुधारक होते

सत्यशोधक चळवळीचे मुकुटमणी

सक्षम कार्यकर्ते शाहू महाराज होते....


आरक्षणासारखे ठोस पाऊल उचलून

दीन- शोषितांचे साधले लोक कल्याण

समता बंधुता यांची शिकवण देणाऱ्या 

'शाहुंच्या' प्रत्येक कार्याला सलाम......


थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती

शाहू महाराज यांचा जन्मोत्सवा निमित्त

हार्दिक हार्दिक शुभेच्छा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract