STORYMIRROR

dipali marotkar

Tragedy

4  

dipali marotkar

Tragedy

राहिले ते स्वप्न अधूरे

राहिले ते स्वप्न अधूरे

1 min
259

तुझ्यासवे जगण्यामध्ये

व्याकुळले मन बिचारे

दूर गेलास तू सोडून

राहिले ते स्वप्न अधूरे...!


बेधुंद अशा वाऱ्यासवे

प्रितीचे वाहतात शहारे

दु:ख जीवनास मिळाले

राहिले ते स्वप्न अधूरे..!


काय करावे मज कळेना

आटलेत आनंदाचे झरे

स्वप्नभंग झाला आणि

राहिले ते स्वप्न अधूरे..!


आठवांचा तुझाच गुंता

छळताना मन हे बावरे

सुख शोधूनही मिळेना

राहिले ते स्वप्न अधूरे..!


विचाराची सांगळ कुठे?

तुझ्याविना जीवन अपूरे

किती आपलेसे करताना

राहिले ते स्वप्न अधूरे..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy