राग
राग
राग मानवाचा शत्रू
पायातूनी माथ्यावर
कसे आवरु तयाला
उसळतो वरवर
कधी छोटेसे कारण
होते निमित्त क्रोधाला
गाढ मैत्री असूनिया
तुटे एकाच क्षणाला
नसे पुरती माहिती
राग डोक्यात घालती
शब्द जाळापरि येती
नाती उसवूनी जाती
राग आरोग्या घातक
रक्तदाब वाढतसे
वेळ निघोनिया जाता
काही उपयोग नसे
राग बाहेर पडावा
मन मोकळे तयाने
कुणी आत धुमसती
मनी राग दाबल्याने
राग आल्यावरी म्हणे
दहा अंक मोजावेत
आठवावे महंतांना
एकनाथ स्मरावेत
राग ताब्यात ठेवाया
हवी अध्यात्मसाधना
मनावरी नियंत्रण
करी योगाची साधना
ठेवा मन नभापरि
दोन बाहू पसरुनी
काही दिसांचेच जिणे
राहू आनंद वर्धूनी
