राधा
राधा
आश्वस्त तुझ्या वचनांची ,करते आता होळी
जगणार आता आहे ,एकलीच राधा भोळी
पुन्हा आठवतील हर सांजेला,मोहक भेटी
विसरता विसरणार नाहीत या प्रारब्ध गाठी
निशब्ध या बकुळीस पुन्हा राधा दिसणार नाही
तिच्या पायथ्याशी आता कोणी असणारं नाही
बासुरी जरी वाजेल रोज मध्यान होता
तरी रुणझुण पैंजणांची आता हसणार नाही
तुझ्या विनाच सजेल पहाटे रोज भूपाळी
हेच एक सत्य लिहिलेले असावे माझ्या भाळी
आस तुझ्या भेटीची बांधली रे मनी
विलक्षण ओढ तुझी किती ध्यानी
