राधा-कृष्ण
राधा-कृष्ण
नातं तुझ्या माझ्या प्रेमाचं
सदैव मनात तेवत राहील
जरी झालेअनंतात विलीन
राधा कृष्ण नाव जोडलं जाईल।।
मरणार तर मी आहेच
पण आत्म्या सोबत माझ्या
युगानुयुगे आपलं प्रेम
ठेवील सांभाळून मनात माझ्या
जेंव्हा घेशील तू पुढचा जन्म
त्या वेळी देखील स्मरून
मी आपल्या प्रेमाची तुला
देईल ओळख पटवून ।।
जन्मोजन्मी आपलं प्रेम
असच दरवळत राहील
राधा कृष्ण म्हणून
जग सारे ओळखत राहील।।

