पूर्णत्व
पूर्णत्व
माझी मायभूमी, पोलादी मनगटाची,
गाथा इथेच फुलली, साई समर्थांची.
रामायण, महाभारत साक्ष तूच देशी,
संत, महात्मांची, लीला तुझ्याच कुशी.
शिकवले दुःख गिळूनी, धैर्याने लढणे.
नव चैतन्यमय होत, पुन्हाने फुलणे.
गंगा,यमुना उगम, तीर्थ चारधाम,काशी,
तुझ्याच उदरी अंकुरित बहुरत्न राशी.
पाहे स्वराज्य तोरणे, शूरशिवरायांची,
कौतुके देखिले माय, मशाल क्रांतीची,
गुलामगिरीच्या बेड्या तोडे, वीरपुत्रांची.
सत्ययुग ते कलयुगे स्मृती अनुभवांची
मीराची भक्ती, शक्ती झाशीच्या राणीची
सुवर्णाक्षरी इतिहास, तृप्ती पुर्णत्वाची.
सुगंध मनी दरवळे, वीर कर्तृत्वाची,
दिव्यत्वाची प्रभात, कुशी अस्तित्वाची.
