पुस्तकाचे पानं...
पुस्तकाचे पानं...
- पुस्तकाचे पानं ऊलगडावे ,तशा आठवणी उलगडत जातात.एखाद्या निवांत क्षणी,डोळे मिटता जरासे कितीकाळ मागे घेऊन जातात.निष्पाप बालपणीच्या निर्धास्त झुल्यावर झुलवतात ................
- तारुण्याच्या ऊबरंठयावर,स्वप्नांच्या मखमली मोरपीसारा फुलवूून गेेेेलेलया,आपल्याच मस्तीत मुक्त जगणारया ,किशोरवयात नेतात.कधी उत्कट, कधी बोथट,कधी कठोर,कधी हळव्या, कित्यक रूपाने या आठवणी पुढ्यत उभ्या राहतात.
- मनाशीच हसणे,कधी ओझरतं रडणं,कधी राग तर कधी निस्सीम प्रेम. भावनांचा कल्लोळ या आठवणी करतात.गूढं रहस्यमयी कादंबरीने अंगावर रोमांच ऊभारावे,तसे भाव सरलेलया आयुष्यातून फक्त उरलेल्या आठवणीत दडलेले असतांत......
- या सारयांचा गुंता सोडवत जन्म मृत्यूच्या दरम्यानचा प्रवास यालाच तर आयुष्य म्हण तात .ते वेचावे लागते सुगंधी फुलासारख.समजून अनुभवाव लागतं पायात रूतलेलया काटयासारख.भरभरुन जगाव लागतं मोकळं विस्तीर्ण आभाळासारख.
- कदाचित् कोणितरी लिहूनच, पाठविल असेल आपलं आयुष्य इथे येतानाच,कादंबरी सारखं आपल्यासोबत घडणारया एकेक घटनेच पानं तोच उलगडत असेल एकेक पानासारखं.
