STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

पुस्तक

पुस्तक

1 min
218

पुस्तक

( अभंग रचना )


ज्ञानाचे भांडार । प्रगतीचे द्वार ।

खोलतो सत्वर । पुस्तक ते ॥ १॥


बोलती अधर । चाणाक्ष नजर ।

शब्दांचाच भर । पुस्तकात ॥ २ ॥


विविध प्रकार । विषय चिक्कार ।

विस्तार चौफेर । पुस्तकाचा ॥ ३ ॥


चांगला विचार । चांगला संस्कार ।

करतो हुशार । पुस्तकच ॥ ४ ॥


जिवना आकार । मित्र तो खंबीर ।

घडला किशोर । पुस्तकाने ॥ ५ ॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational