पुस्तक
पुस्तक
शाळेत पहिले पाऊल ठेवता
ओळख झाली त्याच्याशी
तेव्हा कळाले असते काय
त्या छोट्या छोट्या पुस्तकी.
हळू हळू वर्ग वाढत गेले
पुस्तक स्वरूप बदलत होते
अवघड वाटू लागले सारे
क्षणोक्षणी पुस्तकाची गरज भासे.
मनोरंजन , सुख दुःख ,भावना
या सर्वांनी ते दाटलेले
थोर मोठ्यांंचा अनुभवी शब्दाने
जीवनात पुस्तकांनी प्रोत्साहित केले.
विविध अनुभवांच्या मोतीने
उघडले पुस्तकाचेेे पान
छोटा असो वा मोठा
प्रत्येक शब्दी मिळे मान.
त्याची वाटे प्रत्येकी गरज
वाचनाने निरोगी राही मस्तक
अखंड ज्ञानाचा सागर तो
म्हणूनच म्हणतात त्याला पुस्तक.
