पुरण पोळी
पुरण पोळी
हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजली
कुकर मधे जाऊन पटकन शिजली
साखरेने दिला गोडव्याचा साथ
इलाईची ताईने दिला सुगंधाचा वास
तेव्हा तयारी होईल पुरण पोळी खास ..||ध्रु||..
हरभऱ्याची डाळ छान शिजली
पाटया वर मस्त बारीक केली
चुलीवर ठेवली कडाई ताई
त्यात टाकली हरभऱ्याची मलाई
चुलीत लावली आगपेटीची काळी
शिजाला लागली हरभऱ्याची मलाई
तेव्हा तयार होईल पुरण पोळी बाई...||१||
हरभऱ्याची मलाई छान शिजली
त्यात साखरीने घट्ट पकडाला साथ दिली
सुगंधा साठी इलाईची ताई आली
दोघींच्या सोबतीने पुरण तयार झालं बाई
कनकीच्या गोळ्यात पुरण भरल
पोळपाटा वर लाटून पुरण पोळी तयार केली
तेव्हा तयार झाली पुरण पोळी खास बाई....||२||
