पुराणातली सावित्री
पुराणातली सावित्री
1 min
12.5K
आधुनिक सावित्री बनताना
पुराणातल्या सावित्रीला
विसरू नकोस
पुरोगामित्व मिरवण्यासाठी
उगाच जिभेने घसरू नकोस
ती ही सावित्री बुद्धिमान होती
स्वतःच्या इच्छेने निवडला पती
पतीचे प्राण तिच्या
नेत होता हिरावून
पण तिच्या बुद्धीचातुर्याने
यमदेखील गेला भारावून
श्रद्धा भक्ती आणि
चाणाक्षपणाची जोड
तिच्या चातुर्याला
नव्हतीच तोड
पतीच्या प्राणाबरोबर
गेलेले राज्यही मिळवले
आपल्या कर्तृत्वावर तिने
जगात स्थान मिळवले