STORYMIRROR

yogesh Chalke

Tragedy

3  

yogesh Chalke

Tragedy

पुलवामा भ्याड हल्ला

पुलवामा भ्याड हल्ला

1 min
803



पुलवामा भ्याड हल्ला
कसा घातला काळाने घाला मातृभूमीवरी, पापी सैतानाने केला रक्तपात या भू वरी ॥१॥ चौदा फेब्रुवारी दिनी दाटुनिया आला काळ, पुलवामामध्ये हल्ला होती अमंगल वेळ ॥२॥ दगाबाजी राक्षसांनी केला वार तो मागून , एका फुलदाणीतील फुले गेली कुस्करून ॥३॥ दयनीय देह सारे दाही दिशा विखूरले, विस्पोटकी वाहनाच्या धडकीने ते घडले॥४॥ अतिरेकी कारवाई घडविली दुश्मनाने, पुलवामी भ्याड हल्ला भिजे धरणी रक्ताने॥५॥ अरे पाकड्या मागुन किती खोचशील सुरा, मनगटामधी जोर असल्यास ये सामोरा॥६॥ किती घेशील तू जीव नाही हटणार मागे, सदा जीव न्योच्छावर करू,राहू देशासंगे॥७॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy