पत्र, प्रेम आणि पाऊस
पत्र, प्रेम आणि पाऊस
जीवापाड पत्र ती जपलेली
जुन्या आठवणींचा ठेवा
पावसाचा स्पर्श सुगंधी
प्रत्येक पत्राआड लपलेला
शब्दांचा खेळ असा
रुसवा फुगवा सारा
अबोल शांततेत जणू
पाऊस वारा कोसळणारा
पत्राची घडी उलगडताना
सैल मिठीचा दुरावा तुझा
पाठमोरी तू अशी आता
गंध भोवती दरवळे तुझा
पाऊसही अवकाळी कसा
प्रेमाचा गंध दूर दूर नेणारा
प्रेमपत्र ती हातून जरा
खट्याळपणे वाचणारा
सगळं अवचित घडताना
थांगपत्ता नाही कशाचा
प्रेम, पत्र आणि पावसाचा
खेळ गुढपणे तो चालायचा

