STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

पर्यावरणाचा ऱ्हास

पर्यावरणाचा ऱ्हास

1 min
277

टोलेजंग इमारती

उठवल्या मानवाने

आकाशात घे भरारी

प्रगतीचे तोडी तारे


जंगलात वनराई

हवा स्वच्छ नि मोकळी 

तोडी जंगले निर्दयी

दया माया नाही मनी


गेली सारी वृक्षवल्ली

प्रदूषित झाली हवा

रोगराई दाटतसे

प्राणवायू कमी झाला


नसे पावसाचे चिन्ह

दुष्काळाचे ये सावट

वाट पाही पावसाची

चूक झाल्याने सावध


वृक्ष लावा नि जगवा

नारा लावला तयाने

भरपूर झाडे लावी

लीन हो निसर्गापुढे


होई वरुण संतुष्ट 

पडे वर्षा धुवाधार

डुले मोदे वनराई

पीकपाणी जोरदार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract