STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

पर्यावरण

पर्यावरण

1 min
261

करू जंगलांचे रक्षण 

शुद्ध राहील पर्यावरण 

वृक्षतोडीला आवर घालू 

टाळू जीव सृष्टीचे मरण 


मह्त्त्व पर्यावरणाला लाभले 

त्याने जग तारीले 

त्याचा सखोल अभ्यास 

जीवनाचा भाग झाले 


प्राणी, पक्षी जीवन 

त्याचा लाभे सहवास 

त्यांच्या जीवनाची साखळी 

आधार मिळे निसर्गास 


घट होते त्यांच्यात 

प्राणी जीवन संकटात 

थेट होतो परिणाम 

पर्यावरण अस्तित्व धोक्यात 


एक दुसर्यावर जगणं 

राखते निसर्गाचे संतूलन 

त्यांना निसर्गाची साथ 

सोय केली निसर्गान 


मानवाला मोठे वरदान 

पर्यावरण देतो ऑक्सिजन 

त्याचे परोपकारी जीवन 

माणसांचा जीवन प्राण  


हिरवीगार सृष्टी नटवा 

सर्व वृक्षारोपण करून 

महामारीला संपवू या 

देऊ झाडांना जीवदान 

 

व्हावे त्यांचे जतन  

खत,पाणी घालून 

सुंदर करा परिसर 

व्हावे काळजीन संगोपन 


घ्या मोकळा श्वास 

झाडे लावा भरपूर 

अनेक आजार पळवेल 

निसर्ग तुमचा डॉक्टर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational