पर्यावरण
पर्यावरण
चला चला सारे
परिसर स्वच्छ करू या
करूनी व्यवस्थापन कचऱ्याचे
पर्यावरणाचे रक्षण करू या
ओला कचरा सुका कचरा
अशी विभागणी करू या
दुर्गंधीपासून रक्षण करून
पर्यावरण सुगंधीत करू या
सांड पाण्याचा प्रवाह
नदीत जाण्यापासून रोखू या
नदी-नाले स्वच्छ ठेवून
पर्यावरणाचा मान राखू या
कित्येक झाडांची केली कत्तल
त्यापासून झाडांना वाचवू या
केलेल्या कृत्याची क्षमा मागून
पर्यावरणाचा सांभाळ करू या
झाडे लावा झाडे जगवा
हे ब्रिदवाक्य लक्षात ठेवू या
वसुंधरेचे संगोपन करून
पर्यावरणाचा समतोल राखू या
