STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

4  

Varsha Chopdar

Inspirational

पर्यावरण

पर्यावरण

1 min
27.3K


शीर्षक - एकदा काय झाले ?

एकदा काय झाले ?

गणपती बाप्पा पृथ्वीवर अवतरले

सर्वत्र उत्साहाने फिरू लागले

आजचा गणेशोत्सव बघून निराश झाले

बाप्पाने जनजागृती करायचे ठरविले

लोकांना एकत्र करून सांगू लागले

नका करू वर्गणीचा अट्टाहास

मला साधेपणाची आस

शाडूच्या मातीचा वापर करा

टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची नवनिर्मिती करा

आरास करताना पर्यावरणाचे ठेवा भान

विद्युत ताईचा ठेवा तुम्ही मान

ध्वनी आणि वायूचे प्रदूषण टाळा

निसर्गाचा नियम पाळा

सोन्या-चांदीची नाही मला हाव

सदैव मनात ठेवा जागृत भाव

समजावून सांगितले ना लय भारी

एवढे बोलून बाप्पाची निघाली स्वारी

चला मित्रांनो, संकल्प करूया

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational