STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

प्रत्येक घरातील "ती"

प्रत्येक घरातील "ती"

1 min
615

स्त्री समानतेचा डंका एका दिवसापुरता

महिला दिनाचा मांडला ज्यांनी थाट

सांगा त्यांना तिलाही विचारा

कशी आहे ती??

समाधानी की शोषिक?

नारी शक्तीची आरोळी

कधीच जात नसते तिच्या कानी


पहाटे उठून चुल पेटवते

भाकरी रांधते सर्वांसाठी

समाजरुपी निखाऱ्यावर

त्या ताव्यातील भाकरी प्रमाणे

आपले आयुष्य जाळणारी 

प्रत्येक घरातील "ती"


अंगणातील केर काढतांना

आपल्यातील हुशारीला

झाडुन फेकून देणारी 

प्रत्येक घरातील "ती"


विसळतांना भांडे

मनातील इच्छांना

विसळुन टाकणारी

प्रत्येक घरातील "ती"


धुणी धुतांना

त्या सोबतच

आपल्या स्वप्नांना

कायमचे धुऊन टाकणारी

प्रत्येक घरातील "ती"


कांदा चिरतांना बहाण्याने

आपले अश्रु लपवणारी

प्रत्येक घरातील "ती"


समाजाचा विचार करून

आपले अस्तित्व मिटवणारी

प्रत्येक घरातील "ती"


युग असो कोणतेही

पुरुष प्रधान संस्कृतीत

अग्नीपरिक्षा देणारी फक्त तीच

प्रत्येक घरातील नारी


प्रत्येकीची एकच कहाणी

स्त्री समानतेचा डंका

एकाच दिवसापुरता

पिढ्यान् पिढ्या दुय्यम

ठरवली जाणारी तीच

प्रत्येक घरातील नारी "ती"

कशी आहे "ती" समाधानी की शोषिक?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational