प्रतिसाद
प्रतिसाद
कँन्सर पीडीतांसाठी
वाजविणे प्रयास होता
शंका आणि काहूरांनी
मनी गुंता होत होता
वेळच्या वेळीच आले
रसिक प्रेक्षक हाँलवरी
कुणी खाटांवरी पडूनी
कुणी खुर्चीतची बसूनी
ईशवंदनाने मी केली
अमृतमय सुरवात
टाळ्यांच्या कडकडाटात
श्रोत्यांचा प्रतिसाद खुशीत
बेडवरील मुलीनी
गाणी टेपही केली
तिच्या रसिकवृत्तीनी
मम मती गुंग झाली
बसलेल्या मंडळीत
काही पेशंटही होते
टाळ्या वाजवूनी मज
वन्स मोअर देत होते
ह्या सकारात्मकतेला
प्रणाम मनोभावे केला
प्रतिसाद लाभलेला
तो दिलखुलास होता
