STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

प्रश्न आणि उत्तर

प्रश्न आणि उत्तर

1 min
349

प्रश्न प्रश्न आणि प्रश्न

जाळे प्रश्नांचेच मनी

असे का मम नशिबी?

जाय विचारे झुरुनी


मेळ घर कचेरीचा

ताण कामाचा सदाचा

काम काम हे जीवन

वीट येई प्रपंचाचा


अगं उत्तर तुलाच

शोधायचं आहे खरं

चक्रव्यूह जग तरी

वाट काढायची बरं


समतेचा हट्ट धरी

न्यूनगंड नको ऊरी

उणे नच तुझ्यामधी

लढा देई दुर्गेपरि


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract