STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

प्रपोज दे...!

प्रपोज दे...!

1 min
871


काही काही गोष्टी

काही काही स्वप्न

या ना त्या कारणाने

राहून जातात


हरल्याची भावना

आतल्या आत पोखरते

तेंव्हा

मात्र हे आंदोत्सवाचे दिवस

खरेच उपयोगी पडतात


ते पुन्हा त्या वळणावर

आपोआप घेऊन जातात

प्रत्येक स्वप्न

स्वप्नात का असेना

साकार करतात


आणि एक एक

हुकलेला क्षण परत देतात

जिंकल्याचा आनंद देतात


आणि म्हणतात

आपण बंधन मुक्त आहोत

पाहिजे तेंव्हा भेटू शकतो

प्रपोज करू शकतो


भले मग

स्वप्नात का असेना

सत्याची अनुभूती घेऊ शकतो

आनंदात आनंदी होऊ शकतो


हे क्षण

असेच असतात

निसटले तरी

परत परत येणारे

आणि

अखंड साथ देणारे....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance