STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

प्रपोज डे लावणी..!

प्रपोज डे लावणी..!

1 min
750


मनात माझ्या राया आलं

पाहुनी त्यांना सुख लै झालं

प्रपोज करायचं ठरलं ग बाई

प्रपोज करायचं ठरलं...।।धृ।।


रूप देखणं मनात भरलं

प्रेम त्यांचं उरात ठसल

काळीज माझं बेजार झाल बाई

प्रपोज करायचं ठरलं ।।१।।


रुबाब मोठा मिशी पिळदार

अंगात हो बाराबंदी जोरदार

खरा माझा रखवालदार ग बाई

प्रपोज करायचं ठरलं ।।२।।


पंच क्रोशीची हवा मुखावर

मानमरातब त्यांना चौकीवर

रोमांच काटा फुले अंगावर ग बाई

प्रपोज करायचं ठरलं ।।३ ।।


मनात माझ्या राया आलं

पाहुनी त्यांना सुख लै झालं

प्रपोज करायचं ठरलं ग बाई

प्रपोज करायचं ठरलं...।।धृ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance