प्रणय सुखाचा
प्रणय सुखाचा
रात्र सरावी तशी सरली,
ती काही वर्षे आयुष्याची..!
कूस बदलावी झोपेत तशी,
ती रात्रही पडली आता खर्ची..!
क्षण ना मिळाले शोधुनही सुखाचे,
अजूनी आहे ओढ त्यांच्या मिलनाची..!
इच्छा अपूर्णच आहे अजूनी,
समाधानी मन, अन् जीवाच्या प्रणयाची..!
