प्रकृतीचं एक चमत्कार
प्रकृतीचं एक चमत्कार
हा अवखळ अदृश्य वारा ,
संगे फुलवे मोर पिसारा ,
अलगद येणाऱ्या रेशीम धारा,
ओल्या मातीचा मृदूगंध सारा ,
ही प्रकृतीचं एक चमत्कार ,
सांगतो सृष्टीचा सुंदर पसारा ...
डोगंरदऱ्या उंच पहाडांच्या रांगा ,
धुक्यात शिरते कुठे ढग यावर उतरते,
हिरवी शिंपण सप्तरंगी गोंदण ,
निळाईनेच भरला कुठे सागर किनारा,
चांदणे कुटून सांडली वाळु ,
पानापानांतुन हसते कोवळे ऊन ,
क्षितीजालाही चादर पाघंरुन ,
सुर्य लुप्त सागरातून ,
प्रेमाची गाज ऐकुन ,
चंद्र हासत उमलून फुले ,
श्रावणात मग बांधे झूले ,
निरनिराळे रुपे हिचे ,
प्रेमात कवीमन पडे,
ही प्रकृतीचं एक चमत्कार ,
ऐकून घ्या सांगते गडे ,
ऐकून घ्या सांगते गडे ...
