STORYMIRROR

sarika k Aiwale

Abstract

4  

sarika k Aiwale

Abstract

परके

परके

1 min
226

वेदनेचा भार वाहिला ती संवेदना क्षणभर कण्हते 

सारे भाव घडीचे ठरले ती आस खोलवर रूतते

आजीवन फोल ठरले ती आस भान देऊ पाहते

आजवरी नगण्य ठरले ती पिडा जगवू पाहते 

जिवघेणी सल नजरेत काळजास गवसणी घाले 

वेदनेचे आवेदन घेऊनी ती संवेदना क्षणिक राहते 

प्रयास नाकाम ठरले ती आश्वासने जीवनास छळते 

आसमानी भाव तरले ती भावना खोलवर जळत राहते

आशेची पणती ठरले ना ती आस जगण्याची उरते 

किनारे क्षितिजा पारचे याही मनी ती साद घालते 

क्षणभराचे घाव ठरले आभासी दुनिया अंतरते 

जगात याहून परके मजसवे मन माझेच वागते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract