STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

प्रकाशपर्व

प्रकाशपर्व

1 min
416


प्रकाशपर्व


निसर्गचक्राने येता हिवाळा

दिवस होत चालला छोटा

अंधार लागता सर्वत्र ग्रासू

पणत्यांचा प्रकाशपर्व मोठा


आकाश कंदिल बांधला

दिपमाळाही आल्या मदतीला

झगमग झगमग दारोदारी

दिपोत्सवाच्या स्वागताला


थोडा प्रकाश पेटवू मनात

आशेचा किरण चला लुटुया

जमेल तिथे जमेल तसे

थोडासा आनंद आज वाटुया


विषमतेचा दाटल्या अंधारी

माणुसकीचा दीप पेटावा

समानतेच्या प्रकाशपर्वात

माणसाला माणूस भेटावा


चला गड्यांनो करु सुरुवात

पुसूया अश्रु दीन दुःखितांचे

लावुया पणती अशी आशेची

लोटूया दारिद्रय पुर्वसंचिताचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational