प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन
सकाळी उठून
अंघोळ करून
तयार मी होतो
असा आवरून
कपडे ते स्वच्छ
पॉलीश बुटाला
पाही आरशात
टाय तो नेटका
रांगेत सर्वांच्या
पुढे उभा आज
झेंडा ती सलामी
गर्व होई मज
प्रजासत्ताक तो
फडकतो झेंडा
संविधानकार
दिसतात मला
