प्रिये येना गं
प्रिये येना गं
प्रिये येना गं
प्रिये आठवते मजला
तो स्पर्श मोर पिसाचा
वारा बनून येना
देना जरा दिलासा..
पडता जरी कवडसां
तुझेचं प्रतिबिंब दिसते
फुलांच्या पाकळ्यांतही
तुचं रोज हसते..
वेडा बावरा पिसाटं झालो
कुठंवर धीरं धरू मी
सांगना जरा गं
नजर कुठे वळू मी..
तुझा विरहं सरावा म्हणूनी
रोज मी जळतो
सूर्य मावळतांना मी गं
अश्रूं ढाळीतं रडतो..
आता ओठही सुकले
उडून चालंला रावा
येनां क्षणभर जवळी
चाललो मी दूरच्या गावा !!
रचना
प्र मो द शं. घा टो ळ✍
अमरावती
मो.नं.8007413957

