परिवर्तनाची दिशा
परिवर्तनाची दिशा
परिवर्तनाची दिशा
समाजसुधारकांचा
सत्यशोधक समाज
ज्योतीबांच्या विचारांचा
नष्ट करी जातीभेद
वाट ही प्रबोधनाची
बोध हा सत्यधर्माचा
प्रेरणा माणुसकीची
पाहे ही समाजस्थिती
निश्चय हा करी मना
विद्येविना गेली मती
सांगे जोतिबा सर्वांना
देई शिकवण लोका
करा प्रपंच कष्टाने
दिसे समाज विकास
स्त्री पुरुष समतेने
होई धन्य महाराष्ट्र
लाभूनी हा महात्मा
घे वैचारिक वारसा
तृप्त होई परमात्मा
