प्रित अनामिक
प्रित अनामिक
वाटले रहावे तू सदा सोबतीला
पण हे स्वप्न , क्षणभंगूर , अनामिक होते
कारण जगावेगळे कृष्णा-राधेसमान
अनामिक ,अधूरे,प्रिय तुझे माझे नाते होते....
खरंच विसरशील........का?
हर घडी जीवन जगणे शिकविले
हारलेल्या आयुष्याला जिंकणे शिकविले
अनामिक नात्याला अलिंगन देऊन
विश्वासाच्या रूपेरी माळेत ओवले...
खरच विसरशील............का?
नकार माझा कधी नव्हताच
अन होकार देणे मला शक्य नव्हते
नेहमीच खुलला इंद्रधनू आठवणींचा
आवडेल मला अनामिक राधा होऊन राहणे....
खरंच विसरशील.......का?
नुकतीच होते कळी
संसाराच्या बागेत खुललेली
कळलेच नाही कधी
तुझ्या अनामिक रंगाने चित्रे माझी रंगली...
खरंच विसरशील...........का?
नाही केला अट्टाहास मी
रंगांना बंदिस्त करण्याचा
कारण
पुन्हा प्रश्न उभा
अनामिक नात्यांच्या रंगांचा.....
खरंच विसरशील......... का?
दाटली उरी अशी हिरवळ
हवाहवासा वाटे *गारवा*
तनूवर जशी नागिणीची सळसळ
प्रेमगीत गाई भिरभिरणारा पारवा
तुडवून गारव्याला सुरू झाली पानझड.....
खरंच विसरशील......... का?
बोल तुझे शाश्वत,
नयनात झळके प्रेमरस
इतकेच पुरे मला जगण्यासाठी
मी नित्य तुझ्याशी समरस........
खरंच विसरशील......... का?
श्रावणातही तू जळत होतास
भाव तुझे र्हदयास जाणवत होते
तुझ्या माझ्या श्वासातील अंतर
अनामिक नाते सांगत होते.......
खरंच विसरशील........का?
नाते जरी अनामिक आपले
र्हदयात तू गुप्त आहेस
नाते आपले विश्वासाच्या सप्तसुरांनी
बांधलेले जिवनगित आहे
मनाची मनाशी जुळलेली अनामिक प्रित आहे......।।।
खरंच विसरशील ..........का?