परीचे पैंजण
परीचे पैंजण
1 min
277
परीने पायात घातले पैंजण
घरभर फिरली वाजवत छनछन
परीच्या पैंजणावर होते मोर कोरलेले
मोरासारखेच ताल परीनेही धरले
परीच्या पैंजणाला घुंगरं चार चार
नाचून नाचून परी झाली बेजार
पैंजणाने परीच्या हसले सारे अंगण
आनंदाने भरून आले,आई-बाबांचेही मन