STORYMIRROR

Alka Dhankar

Romance Others

4  

Alka Dhankar

Romance Others

प्रेम म्हणजे काय असतं

प्रेम म्हणजे काय असतं

1 min
414

प्रेम म्हणजे काय असतं?

प्रेम म्हणजे .....

भ्रमराने फुलाचा अलगद लुटलेला गं

मावळत्या रवीला क्षितिजाने मारलेली घट्ट मिठी

हलके हलके बागडणाऱ्या फुलांचा अवखळ वाऱ्याने वाहून नेलेला सुगंध

प्रेम म्हणजे...............

बाळाच्या भुकेने मायच्या छातीला लागलेली पान्ह्याची धार

धरनीच्या कुशीत फुललेला अंकूर हिरवागार

प्रेम म्हणजे..........

पहाड,टेकड्या,दऱ्या,खोऱ्या पार करून समूद्रात सामावणारी नदी

गच्च ,रसाळ फळ सांभाळत झुकलेली फांदी

प्रेम म्हणजे निसर्गाकडे डोळे भरून पाहणं

पाहता पाहताच त्यात हरवून जाणं

जस सख्याच प्रेम प्रियेच्या हातावर मेंदीच्या रंगाने खुलून दिसनं.........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance