STORYMIRROR

Alka Dhankar

Romance

4.8  

Alka Dhankar

Romance

आठवणीतली गुलाबी थंडी

आठवणीतली गुलाबी थंडी

1 min
980


मुखडा चंद्रमुखी उघडा ठेवून

गुलाबी थंडीत ती झोपली शांत

रूप तीच पाहून, झाले मन माझे अशांत


हळूच कुंतलात मी,तीच्या फिरवले बोट

स्पर्शून तीला,असे सरसरले ओठ

अधीर मन झाले, मेंदीच्या,गंधात 


बंद नयनपाकळ्या,हळूच खूलवत

टाकला तिने दीर्घ श्वास

आणि पटकन घेतला, माझा

हातात हात.....


हातात हात घेता ,हृदयात हलचल झाली

कळलेच नाही, कधी, गुलाबी थंडीत 

गुलाबी रात्र सरून गेली.......।।



Rate this content
Log in