कन्यादान
कन्यादान
1 min
443
कन्यादान.......
जन्म कन्येचा
लय भाग्याचा ....२
धन्य झाले मी
आली कन्या घरी
आनंदाला येते उधाण
जेव्हा हासते परी
जनक राजाला लाभले
भाग्य जानकीच्या कन्यादानाचे
भाग्य कसे उजळले
आयोध्या नगरीचे
दानामध्ये दान
मोठं कन्यादान
ज्याच्या घरी कन्या
ते घरची चारीधाम
कन्याकळी सुकुमार
फुलू द्या अंगणी
पेटवा मशाल माणूसकीची
नाही ओझं रे तीचं,
घडीभराची ती पाहुणी.....।।