प्लास्टिक एक घोर समस्या,
प्लास्टिक एक घोर समस्या,
जय देवी जय देवी
कँरीबँग माता
स्वच्छता कशी राखावी
तुजविन आता $$$$।।१।।
घरातली घान
प्रवासाची शान
कधीही नेण्यासाठी नव्हता
कापडी पिशवीचा ताण
कशी घेऊ कापडी पिशवी हाता$$$$।।2।
ओला कचरा सुखा कचरा
सारा त्यात भरला
आकाऱ्या ओकाऱ्याचीही
तुच होती त्राता$$$$$।।3।।
बाळाचे हगिज,नँपिज
तुच होती सांभाळीत
सगळी घान आईने सांग
कशी लपवावी आता?
बहुउपयोगी तू होती बहूगुणी
प्रदुषण पसरवलेस चहूबाजूनी
प्राणही गमावले खाऊन
मुक्या जनावरांनी आता $$$।।5।।
आली होतीस मदतीसाठी
पण मानवाने अती घेतला फायदा
वागला सोडून सारा कायदा
दंड भरण्याची अद्दल मानवा
चांगली घडव जाता जाता $$$$ ।।6।।