साहसी हिरा
साहसी हिरा
1 min
333
शिवरायाच्या दरबारी गवळन हिरकणी
दुध छत्रपती गडा टाकूनी
बाळासाठी निघाली परतूनी
गडबंद पाहूनी,जीव कासावीस,मनी
बाळं झाले भुकेले सांगे
माऊलीचा पान्हा,कसा पाहू कान्हा
प्रश्न मोठा काळजाचा सतावी मना
दुःख सोसवेना ,सांगेना कुणा
मनी बांधून गाठ साहसाची
अडखळ,अवघड,गड उतरली
आली धावून घरा,नसे तमा जखमाची
साहसाने झाली *हिरकणी*,हिरा गवळणीची.......।।